0
डाळिंबाला बाजारात कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे बळिराजा संकटात सापडला आहे. मागील वर्षी ७०ते ८० रुपये किलो दर असलेल्या डाळिंबाला यंदा केवळ २० रुपये किलो इतका दर मिळत आहे.डाळींब हे कमी क्षेत्रात चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून कसमादे भागातील अनेक शेतकऱ्यांनी डाळींब पिकाची लागवड केली. तळहाताच्या फोडाप्रमाणे जतन केलेल्या डाळिंबावरयावर्षी सुरुवातीपासूनच निसर्गाने अवकृपा केली.


जानेवारीत बहार धरलेल्या डाळींब पिकावरफूल निघण्याच्या काळात आणि फळधारणेच्या वेळी म्हणजेच फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे अनेक बागा उद्ध्वस्त झाल्या. काही शेतकऱ्यांनी महागड्या औषधांची फवारणी करून बागा वाचवण्यात यश मिळवले. मात्र मे व जून महिन्यात तेल्या रोगाने पुन्हा डाळिंबावर झडप घातली. त्यामुळे शेकडा ७० टक्के बागा उद्ध्वस्त झाल्या. तेल्या रोगाने परिसरात थैमान घातले होते. त्यामुळे हातात आलेले डाळिंबाचे फळे तोडून फेकून देण्यात आली आणि अशातच वाचलेल्या डाळिंबाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी मात्र पूर्णपणेहवालदिल झाला आहे.व्यापारीवर्गाने शेतात येऊन डाळींब खरेदी केल्यास ते शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते कारण त्यामुळे त्यांचा वाहतूक, आडत, हमाली हा खर्च वाचतो. मात्र व्यापारी डाळींब खरेदीला येत नसल्यामुळे पक्का झालेला डाळींब मार्केटमध्ये नेऊन विकण्याशिवाय बळिराजाला पर्याय नाही. आज डाळिंबाला सरासरी २० रुपये किलो असा दर मिळत आहे. अशा दरामुळे शेतकऱ्यांचा डाळिंबाला झालेला खर्चसुद्धा निघेणासा झाला आहे. डाळींब पिकाला बहार धरल्याच्या दिवसापासून तर डाळींब निघेपर्यंत एकरी सव्वा ते दीड लाख रुपये खर्च होतो आणि उत्पन्न एकरी पाच ते सहा टन येते. यावरून डाळिंबाचा होणारा खर्चसुद्धा निघत नसल्याचे चित्र स्पष्ट होते.परदेशात जर डाळींब विक्री चालू झाली तर भाव थोड्याफार प्रमाणात वाढतील, असे व्यापारीवर्गात बोलले जात आहे. म्हणून सध्यातरी निर्यात चालू होण्यासाठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे. (वार्ताहर)डाळिंबाला द्या मोजून पाणीदर्जेदार डाळिंब फळांचे उत्पादन मिळविण्यासाठी तसेच डाळिंब बागा निरोगी राहून अधिक वर्ष टिकवण्यासाठी झाडांना लागणारे पाणी हे त्या ठिकाणी असणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग (मि.मी.) विचारात घेऊन ठिबक सिंचन पद्धतीने देण्यात यावे. झाडाचे वय, बाष्पीभवनाचा वेग, पात्र गुणांक, पीक गुणांक, डाळिंब झाडाचे क्षेत्रफळ, ओलित गुणांक, जमिनीचा प्रकार यावर पाण्याची गरज अवलंबून असते. हवामान आणि झाडाच्या वाढीनुसार डाळिंबाच्या झाडाला पाण्याची गरज बदलत असल्याने त्याच्या वय व अवस्थेनुसार पाणी किती व कसे द्यावे हे समजून घेणे अत्यावश्यक आहे. शास्त्रीयदृष्ट्या डाळिंबाच्या झाडाला पाण्याची गरज काढण्यासाठी खालील बाबी लक्षात घ्याव्या लागतात ःझाडाचे वयपाणी व्यवस्थापन करतेवेळेस झाडाचे वय हा फार महत्त्वाचा घटक आहे.झाडाला पाणी वयानुसार व वेगवेगळ्या अवस्थेनुसार लागत असून, फळ पक्व होण्याच्या काळात पाणी सर्वांत जास्त लागत असते. म्हणूनच झाडाचे वय व विस्तार वाढत असतो. तसेच पाण्याची आवश्यकता वाढत असते. डाळिंबास ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देताना त्याची दररोजची पाण्याची गरज आहे. ठिबक सिंचनाद्वारे पाणी देताना दररोजचे बाष्पीभवन लक्षात घेऊन दररोज पाणी दिले जावे. ज्या ठिकाणी दिवसाआड पाणी द्यावयाचे आहे तेथील एक दिवसामधील पाण्याची गरज काढता येते.बाष्पीभवनाचा वेगदररोज 24 तासांत किती बाष्पीभवन झाले हे काढण्यासाठी पात्राचा उपयोग केला जातो. त्यास इंग्रजीत "पॅन इव्हॅपोरोमीटर' असे म्हणतात. बाष्पीभवनाचा वेग हा मि.मी./ दिवस या परिमाणात दररोज सकाळी 8.30 वा. मोजला जातो. डाळिंबाच्या झाडांनापाणी देत असताना समजा मध्येच पाऊस आला, तर अशा वेळेस पडलेल्या एकूण पावसापैकी किती पाणी डाळिंबासाठी उपयुक्त झाले हे काढणे आवश्यक असते.समजा दररोजच्या बाष्पीभवन वेगापेक्षा जास्त पाऊस पडला तर झाडांना पाणी देण्याची गरज नाही. बाष्पीभवनापेक्षा जर पाऊस कमीपडला तर बाष्पीभवनातून पाऊस वजा करून शिल्लक राहिलेले बाष्पीभवन लक्षात घेऊन झाडांना पाणी द्यावे लागेल. पाऊस जर प्रमाणापेक्षा जास्त पडला तर मात्र जमिनीच्या प्रकारानुसार झाडांना पाणी द्यावे. दररोजचे बाष्पीभवन व पाऊस लक्षात घेऊन पाणी द्यावे. दररोजचे बाष्पीभवन त्या त्या ठिकाणच्या हवामानानुसार बदलत असते. ते दररोज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असू शकते. पाऊस पडल्यानंतर डाळिंबाच्या झाडांना घ्यावयाचे बाष्पीभवन उदाहरणासहित तक्ता क्र. 1 मध्ये दिलेला आहे. जर दररोज बाष्पीभवनाचा वेग मिळवणे शक्य नसेल तर त्यावर उपाय म्हणून मागील 20 ते 25 वर्षातील बाष्पीभवनाच्या आकड्याची सरासरीलक्षात घेऊन त्यानुसार डाळिंबाच्या झाडांना पाणी किती लागेल हे काढता येईल.सोलापूर विभागाची मागील 25 वर्षांची बाष्पीभवनाची दररोजची सरासरी हस्त बहरमधील तक्ता क्र. 2 मध्ये दिलेली आहे. या बाष्पीभवनाचा दररोजच्या सरासरीचा उपयोग डाळिंबाच्या झाडांना दिवसाआड पाणी देण्यासाठी होईल.डाळिंब झाडाचे क्षेत्रफळएका झाडाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी खालील सूत्राचा उपयोग करावा.एका झाडाचे क्षेत्रफळ (चौ.मी.) = दोन ओळींतील अंतर (मी). ु दोन झाडांतील अंतर (मी.)जमिनीचा प्रकारठिबक सिंचन देताना तोट्याची व सिंचन पाळीतील अंतर जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याची गरज लक्षात घेऊन काढावी लागतो. हलक्याजमिनीत पाणी आडवे जास्त पसरत नाही म्हणून तोट्यांची संख्या जास्त ठेवावी लागते. त्याचप्रमाणे हलक्या जमिनीत पाणी साठविण्याची क्षमता कमी असल्याने त्यामध्ये पाणी दररोज देणे जास्त सयुक्तिक असते, मात्र मध्यम ते खोल जमिनीत पाणी दिवसाआड दिले तरी चालते.ः डॉ. मेश्राम ः (लेखक राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर येथे कार्यरत आहेत.)डाळिंब झाडावर फळे व फुले असताना योग्य प्रमाणातच पाणी द्यावे. झाडांना भरपूर प्रमाणात पाणी दिल्यामुळे फळ तडकण्याचे, मररोग आणि तेल्या रोग वाढण्याचे प्रमाण जास्त आढळून आले आहे. दर्जेदार फळांच्या उत्पादनाकरिता झाडाच्या वेगवेगळ्या अवस्थांनुसार गरजेनुसारच पाणी द्यावे.

Post a Comment

Random Post

 
Top