0

जलयुक्त शिवारसाठी दिलेले 32 चेक बाऊन्स

✏✏✏✏✏

मुंबई : जलयुक्त शिवार योजनेसाठी दिलेले चेक ही निव्वळ चमकोगिरी होती का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या योजनेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेले 32 चेक बाऊन्स झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामधील अनेक चेकवर भाजप नेत्यांची नावं आहेत.

दरम्यान, हे चेक बाऊन्स होत असतील तर त्यांच्यावर कलम 138 नुसार कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे.

खरंतर जलयुक्त शिवार ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेसाठी अतिरिक्त पैसा उभा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मदत करण्याचं आवाहन केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी मदतीचे धनादेश दिले.

परंतु काही जणांनी फक्त चमकोगिरी करण्यासाठी मदतीचे धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले. प्रत्यक्षात त्यांच्या अकाऊंटवर पैसे नसल्याने ते धनादेश वठले नाहीत. यात काही भाजप नेत्यांचाही समावेश आहे. त्यामुळे अशा चमकोंवर आता मुख्यमंत्री कारवाई करणार का? हा प्रश्न आहे.
✏✏✏✏


हे सरकार चेक बाऊन्स करत आहे
  फसवणूक करत आहे
सरळ सरळ दिसते

Post a Comment

Random Post

 
Top