मुंबई, दि. २२ - आज पहाटे मुंबई पुन्हा'हिट अँड रन'प्रकरणाने हादरली, मस्जिद बंदरच्याक्रॉफर्ड मार्केटजवळ एका भरधाव वेगाने येणा-या गाडीने फूटपाथवरील ५ नागरिकांना चिरडले असून दोघांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारचालक आमिन युसूफ खान याला अटक केली असून तो बीएमसीमधील कंत्राटदार असल्याची माहिती समोर येत आहे. काल रात्री ५ जणांना चिरडल्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला होता. या प्रकरणी पायुधीन पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक मुंबईकरांप्रमाणे काल रात्रीही एक कुटुंब मस्जीद बंदरच्या क्रॉफर्ड मार्केटजवळील मोहम्मद अली रोडवरील फूटपाथवर झोपले असताना एक अज्ञात कारचालक भरधाव वेगाने गाडी चालवतआला आणि नियंत्रण सुटल्याने कार फूटपाथवर चढली. या घटनेत चार महिलांसह एक मुलगा जखमी झाला असून दोघींची प्रकृती अतीशय गंभीर आहे. सर्व जखमींवर जे. जे. हॉस्पिटलमध्ये उपचारसुरू आहेत.आज झालेल्या या घटनेमुळे फूटपाथवर झोपणाऱ्यांच्या सुरक्षेतेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.हिट अँड रनच्या काही गाजलेल्या घटना->>>अभिनेता सलमान खान-२८ सप्टेंबर २००२ हिट अँड रन प्रकरण घडले. सलमानने लँड कु्रझर गाडी भरधाव चालवत वांद्रे येथील अमेरिकन एक्सप्रेस बेकरीजवळील फुटपाथवर चढवली. फुटपथावर झोपलेले पाच जणगाडीखाली चिरडले गेले.यातील एकाचा बळी गेला. याप्रकरणी सलमानविरोधात वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात भरधाव गाडी चालवण्याचा खटला सुरू होता. मात्र २००३ मध्ये सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यात आला व हा खटला सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला. सबळ पुराव्याअभावीसलमान खानची निर्दोश मुक्तता करण्यात आली.>>>संजीव नंदा (नवी दिल्ली)- २ वर्षे कैद व समाजसेवाआरोपी- संजीव नंदा, निवृत्त नौदलप्रमुख एस. एम. नंदा यांचा नातूघटनेचा दिनांक- १० जानेवारी १९९९मद्यधुंद अवस्थेत सुसाट वेगाने बीएमडब्ल्यू मोटार चालविल्याने दिल्लीत लोधी रोडच्या चौकात तीन पोलिसांसह एकूण सहा जणांचा चिरडून मृत्यू.घटनेनंतर १० वर्षांनी सुरुवातीस निर्दोष मुक्तता.जनक्षोभानंतर खटल्याची फेरसुनावणी. त्यात तीन वर्षांचा कारावास.२०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा कमी करून दोन वर्षे केली. त्याशिवाय मोठा दंड आणि दोन वर्षे समाजसेवा करण्याचा आदेश>>>अॅलिस्टर परेरा (मुंबई)आरोपी- अॅलिस्टर अॅन्थनी परेरा. उद्योगपतीचा मुलगा.घटनेचा दिनांक-१२ नोव्हेंबर, २००६मद्यधुंद अवस्थेत सुसाट वेगाने टोयोटा कोरोला मोटार चालविल्याने मुंबईत वांद्रे येथील कार्टर रोडच्या पदपथावर झोपलेले सात बांधकाम मजूर चिरडून ठार, आठ जखमी. दंडाधिकारी न्यायालयात सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा. सर्वदूर टीका झाल्यानंतर शिक्षा वाढविण्यासाठी उच्च न्यायालयाचा स्वत:हून हस्तक्षेप.वर्ष २००७- निष्काळजीपणाने मोटार चालविल्याबद्दल उच्च न्यायालयाकडून तीन वर्षांच्या कारावासाची व जबर भरपाईची शिक्षा. सर्वोच्च न्यायालयातही ही शिक्षा कायम. राज्य सरकारने मागणी न केल्याने शिक्षा याहून वाढविण्यास नकार.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment