नवी दिल्ली, दि. २४ - लोकसभा निवडणुकीत सत्ता स्थापनेसाठीभाजपाला संपूर्ण बहुमत मिळवून देण्यात अतिशय मोलाचा वाटा बजावणारे अमित शहा यांची आज भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पुन्हा निवड करण्यात आली. भाजपाध्यक्षपदासाठी आज पार पडलेल्या निवडणुकीत शहा यांच्या विरोधात कोणीच उभे न राहिल्याने त्यांची एकमताने आणि बिनविरोध निवड झाली. पुढील तीन वर्षांसाठीअमित शाहयांच्याकडेच अध्यक्षपदाची धुरा राहणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर राजनाथ सिंह यांनी भाजपाचे अध्यक्षपद सोडलं होतं. त्यामुळे पदाची जबाबदारी शाह यांच्या खांद्यावर देण्यात आली होती व ते त्यांचा कार्यकाळ पूर्ण करत होते. मात्र दिल्ली आणिबिहारमध्ये भाजपच्या पराभवानंतर शहा यांच्या उचलबांगडीची चर्चा सुरु झाली होती. अखेर आज शाह यांचीच पुन्हा अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आल्याने सर्व चर्चा थंडावल्या.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment