0

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील सम-विषम कार योजना यशस्वी झाल्याचा दावा करणाऱ्या केजरीवाल सरकारची ‘धन्यवाद रॅली’ रविवारी एका तरुणीने उधळून लावली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे भाषण सुरू असतानाच सदर तरुणीने त्यांच्यावर शाई फेकली.सम-विषम योजना यशस्वी ठरल्यानंतर येथील छत्रसाल स्टेडियममध्ये आभार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी केजरीवाल यांचे भाषण सुरू असतानाच एक विशीतील तरुणी हातातकागद घेऊन मंचाजवळ आली. काही क्षणांतच तिने केजरीवाल यांच्यावर शाई फेकली. ही शाई केजरीवाल यांच्यापर्यंत पोहोचू शकली नाही; मात्र मंचावर शाईचे डाग दिसले. या घटनेनंतर पोलिसांनी लगेच या तरुणीला ताब्यात घेतले. दरम्यान, हा भाजपाचा कट असून भाजपा नेते कोणाचा जीवही घेण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, असा गंभीर आरोप आपने केला आहे.केजरीवालांवर शाईहल्ला करणारी भावना अरोडाही तरुणी आम आदमी सेनेची सदस्य आहे. दिल्ली सरकारने राजधानीतील सम-विषम कार योजनेच्या आडून सीएनजी घोटाळा झाला असल्याचा तिचा आरोप आहे. आपल्याकडे पुरावे असल्याचा दावाही तिने केला.

Post a Comment

Random Post

 
Top