मेलबर्न, दि. २९ - आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला टी-२० टूर्नामेंटमधील दुस-या सामन्यातही भारताने ऑस्ट्रेलियावर १० गडी राखून मात करत तीन सामन्यांची ही मालिका २-० अशी खिशात टाकली.मेलबर्न येथे रंगलेल्या सामन्यात भारतीय महिला खेळाडूंनी शानदार प्रदर्शन करताना विजयाचा धडाकाकायम ठेवला. डकवर्थ लुईस नियमानुसार भारताने हा सामना १० गडी राखून जिंकला.ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी २० षटकांत ८ गडी गमावून १२५ धावा करत भारतासमोर विजयासाठी १२६ धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र भारताची फलंदाजी सुरू झाल्यानंतर पावसाचा व्यत्यय आल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार भारतासमोर १० षटकांत ६६ धावांचे आव्हान होते. कर्णधार मिताली राजने (नाबाद ३७) स्मृती मंधानाच्या (नाबाद २२) साथीने हे लक्ष्य अवघ्या ९.१ षटकांत पूर्ण करत हा सामना व मालिका खिशात टाकली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment