मुंबई, दि. ३० - मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राऊंडवर आज सकाळी पुन्हा भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या तसेच ६ वॉटर टँकर्स दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र जोरदार वा-यामुळे आग आणखीनच धुमसतचालली आहे. देवनार डम्पिंग ग्राऊंडवर गुरूवारी पहाटे लागलेली आग शर्थीच्या प्रयत्नांनंतर शुक्रवारी संध्याकाळी आटोक्यात आली होती. मात्र शनिवारी सकाळी पुन्हा ही आग भडकली असूनधुरामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment