श्रीनगर :जम्मू काश्मिरचे मुख्यमंत्री आणिPDP चे संस्थापकमुफ्ती मोहम्मद सईद यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 79 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे 22 डिसेंबरला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नव्हती. अखेर आज सकाळी 8 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.मुफ्ती मोहम्मद सईद हे गेल्या वर्षीच जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदीविराजमान झाले होते. मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची दुसरी वेळ होती.मात्र आश्चर्य म्हणजे यावेळी सईद यांच्या पीडीपीने चक्क भाजपसोबत युती करून सरकार स्थापलं होतं.गेल्या वर्षी झालेल्या जम्मू काश्मीर विधानसभेत मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पीपल्स डेमोक्रॉटीक पार्टीने सर्वाधिक 28 जागा जिंकल्या होत्या. तर दुसऱ्या क्रमांकावरील भाजपने 25 जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन इथे सरकार स्थापन केलं. वेगवेगळ्या भूमिका असलेले दोन पक्ष चक्क एकत्र आल्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. मुफ्ती यांनी 1 मार्च 2015 रोजी जम्मूकाश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या रूपानं देशाला पहिला मुस्लिम गृहमंत्री मिळाला होता. 1989 ते 90 च्या व्ही पी सिंग सरकारमध्ये ते केंद्रीय गृहमंत्री होते. मात्र 1989 साली मुफ्तींचं केंद्रीय गृहमंत्रीपद वेगळ्याच कारणाने गाजलं . त्यांची तिसरी कन्या रूबैया हीचंअतिरेक्यांनी अपहरण केलं होतं. त्याबदल्यात त्यांनी 5 अतिरेकी सोडण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली होती.First Published:Thursday, 7 January 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment