0

पुणे, दि. २७ - ज्येष्ठ मराठी कवी व साहित्य समीक्षक तसेच मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष द. भि. कुलकर्णी (दत्तात्रय भिकाजी कुलकर्णी) यांचे आज सकाळी निधन झाले.वयाच्या ८२ व्या वर्षी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २५ जुलै १९३४ साली नागपूरमध्ये जन्मलेल्या द.भि. यांनी १९६८ साली नागपूर विद्यापीठातूनपी.एच. डी केली.  त्यांच्या अनेक ग्रंथांचा नागपूर, पुणे व उस्मानिया विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत संदर्भग्रंथ म्हणून समावेश करण्यात आला आहे. ते २०१० साली पुण्यात झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. त्यांना १९९१ साली महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तसेच 'अंतरिक्ष फिरलो पण' या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा ’उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार’ होता. अध्यक्ष, , पुणे, मार्च २०१०द.भि. कुलकर्णी यांचे प्रकाशित साहित्य :- अंतरिक्ष फिरलो पण..- अन्यनता मर्ढेकरांची- अपार्थिवाचा यात्री- अपार्थिवाचे चांदणे (आठवणी)- कादंबरी : स्वरूप व समीक्षा- चौदावे रत्न- जीएंची महाकथा- जुने दिवे, नवे दिवे(ललित लेख)- दुसरी परंपरा

Post a Comment

Random Post

 
Top