अजनाळे नगरी
ब्रेकींग न्यूज
सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनावर ट्रक घालण्याचा प्रयत्न
13 जानेवारी 2016 - 06:34
सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील लऊळ गावात सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या वाहनावर वाळूमाफियांनी ट्रक घालण्याचा प्रयत्न केला.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी वाळूच्या गाड्या अडविल्याच्या रागातून हा प्रकार घडला आहे. सोलापूरात वाळू माफियांचा धुमाकूळ सुरूच आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. वाहन चालकावर कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कृत्यातून जिल्हाधिकारी मुंढे थोडक्यात बचावले आहेत.
Post a Comment