हैदराबाद, दि. ३० - हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थीरोहित वेमुला याच्या आत्महत्येप्रकरणीसुरू असलेल्या सहभागी झालेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी उपोषणास बसणार आहेत. याप्रकरणी निषेध नोंदवणा-यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राहुल गांधीशुक्रवारी रात्री हैदराबादमध्ये पोहोचले आणि राहुल सुमारे दोन तास आंदोलकांसह ठिय्या आंदोलनात सहभागी झाले.दरम्यान मृत रोहित वेमुलाचा आज (३० जानेवारी) वाढदिवस असून त्यानिमित्तविद्यार्थ्यांनी आपले आंदोलन आणखीनच तीव्र करतकँडल मार्च काढून रोहितला श्रद्धांजली वाहिली. याआंदोलनातही सहभागी झालेल्याराहुल यांनी रोहितला श्रद्धांजली वाहिली. दरम्यान विद्यार्थ्यांच्या आंदोलनापूर्वी विद्यापीठाचे अंतरिम कुलगुरू विपिन श्रीवास्तव सुट्टीवर गेले आहेत. रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर राहुल गांधी यांनी दुसऱ्यांदा हैदराबादला भेट दिली आहे. दरम्यान याप्रकरणी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी तसेच केंद्रीय राज्यमंत्री बंडारु दत्तात्रेय यांना हटविण्याची मागणी होत आहे. तसेच कुलगुरू अप्पारावपोडिले यांना पदावरून हटवावे व प्रभारी उपकुलगुरू विपिन श्रीवास्तव यांनी पदभार सोडावा, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे. हैदराबाद विद्यापीठात शिकणा-या रोहित वेमुलाने विद्यापीठात होणा-या भेदभावामुळे १७ जानेवारी रोजी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment