पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रविवारी दुपारी रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. रुग्णालयाचे प्रमुख डॉ. परवेझ ग्रांट यांच्या देखरेखीखाली पवार यांच्यावर उपचार चालू आहेत़ डॉ़ ग्रांट म्हणाले, पवार यांच्या शरीरातील द्रव पदार्थांचा समतोल बिघडल्याने त्यांना दाखलकरण्यात आले आहे़ आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही़ परंतु त्यांना विश्रांतीची आवश्यकता आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment