0

कॅनबेरा, दि. २० -भारताविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी ३४९  धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सलामीवीर एरॉन फिंच (१०७) शतकी खेळी आणि डेव्हीड वॉर्नरच्या (९३) धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ही मजल मारली.  दोघांनी पहिल्या विकेटसाठी १८७ धावांची भागादारी केली. वॉर्नरला इशंताने तर, फिंचला उमेश यादवने इशांतकरवी झेलबाद केले. हाणामारीच्या षटकात मॅक्सवेलने २० चेंडूत (४१) आणि कर्णधार स्मिथनेही २९ चेंडूत (५१) धावा तडकावल्यामुळेऑस्ट्रेलियाला ३५० पर्यंत पोहोचता आले. पहिल्या तीन सामन्यांप्रमाणे या सामन्यातही भारतीय गोलंदाज झगडताना दिसले. ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखणे त्यांना जमले नाही.  मार्शने (३३) , बेलीने (१०) धावा केल्या. हाणामारीच्या षटकात फॉकनर आणि वाडे भोपळाही न फोडता तंबूत परतले. इशांत शर्माने सर्वाधिक चार गडी बाद केले असले तरी त्यासाठी त्याने १० षटकात ७७ धावा मोजल्या. उमेश यादवे १० षटकात ६७ धावा देत तीन गडी बाद केले. आणखी संबंधित बातम्या

Post a Comment

Random Post

 
Top