संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात, कामकाज चालू देण्याचं काँग्रेसचं आश्वासन, जेएनयू प्रकरणावरुन गदारोळाची शक्यता
———————————-
हरियाणातील जाट आंदोलकांवर सैन्याचा गोळीबार, तिघांचा मृत्यू, तर आरक्षणासाठी बिगर राजकीय समिती स्थापन करण्याची सरसंघचालकांची मागणी
———————————-
चार महिने जेएनयू बंद ठेऊन सर्व विद्यार्थ्यांची कसून चौकशी करा, सुब्रमण्यम स्वामींची मागणी, कन्हैयाच्या अर्जावर आज कोर्टात सुनावणी
————————————
पम्पोरमध्ये तीनही दहशतवाद्यांना कंठस्नान, तब्बल तीन दिवसानंतर ऑपरेशन संपलं, 2 कॅप्टनसह पाच जवानांना वीरमरण
————————————-
पानगाव प्रकरणाचं राजकीय भांडवल करण्याचा एमआयएमचा डाव, पीडित शेख कुटुंबियांचा आरोप, आरोपींच्या अटकेची मागणी
————————————–
संजय दत्त लवकर सुटण्याच्या बातमीने चाहत्यांचा जल्लोष, मुंबईतल्या हॉटेलमध्ये संजूबाबाच्या नावे चिकन संजूबाबा नावाची खास डिश
—————————————
नांदेडमध्ये आंदोलकांवर पोलिसांचा अमानुष लाठीहल्ला, 25 जण जखमी, बसवेश्वरांचा पुतळा उभारण्यासाठी पालिकेवर मोर्चा
—————————————
बारामतीत ट्रॅक्टरखाली चिरडून सहा वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी बापू देवकाते अटकेत, पूर्ववैमनस्यातून प्रकार
—————————————–
106 वर्षाची आजी बराक आणि मिशेल ओबामांच्या भेटीला, व्हाईट हाऊसमध्ये तिघांनीही धरला ठेका
——————————————
बांगलादेश दौऱ्यावरच्या टीम इंडियाला मोठा धक्का, धोनीच्या पाठीत भरली उसण, आशिया चषकासाठी पार्थिव पटेलची संघात निवड
Post a Comment