हेडलाईन्स
#संजय सुटला : संजय दत्तचं चार्टर्ड प्लेन 10.30 वाजता पुण्याहून मुंबईच्या दिशने निघणार——————
अभिनेता संजय दत्त येरवडा तुरुंगातून बाहेर, मुंबईकडे रवाना———————#पुणे : संजय दत्त कोणत्याही क्षणी तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता, संजूबाबाच्या सुटकेविरोधात येरवडा जेलबाहेर निदर्शनं————————-
1. 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी संजय दत्त आज सुटणार,संजुबाबाच्या स्वागतासाठी राहत्या घरी जय्यत तयारी
2. सुरेश प्रभूंच्या रेल्वे अर्थसंकल्पाकडून महाराष्ट्राला डोंगराएवढ्या अपेक्षा, कोणत्याही नवीन गाडीची घोषणा नाही, प्रवासी भाडही जैसे थेच
3. राजकारणासाठी तरुणांचा वापर करु नका, रोहित वेमुला, जेएनयू चर्चेवर स्मृती इराणींनी काँग्रेसला फटकारलं, शिक्षणाचं भगवेकरण होत नसल्याचा दावा
4. देशविरोधी घोषणांचे आरोपी उमर खालिद आणि अनिर्बानला तीन दिवसांची पोलीस कोठडी तर कन्हैयाचाही जामीन हायकोर्टानं फेटाळला
5. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल, छगन भुजबळ, समीर आणि पंकजचाही समावेश, लाचलुचपत विभागाची कारवाई
6. पानगाव प्रकरणी गृहराज्यमंत्री राम शिंदे आणि महासंचालक प्रवीण दीक्षित लातूरमध्ये, हल्लेखोरांमध्ये सर्वपक्षीयांचा समावेश
7. भिवंडीत डाईंग कंपनीला भीषण आग, आगीत कंपनी जळून खाक, तर मुंबईत रेल्वेची भिंत पडून दोघांचा मृत्यू
8. धोनीच्या टीम इंडियाची आशिया चषकात विजयी सलामी; यजमान बांगलादेशचा 45 धावांनी धुव्वा
Post a Comment