हेडलाईन्स:
छगन भुजबळांविरोधात राजकीय सूडबुद्धीनं कारवाई, शरद पवारांकडून भुजबळांची पाठराखण,तर समीर भुजबळांना ईडीची कोठडी, राष्ट्रवादीची राज्यभर निदर्शनं——————————
अनुपम खेर यांना पाकिस्तानात नो एन्ट्री, काश्मिरी पंडित असल्यानं पाकनं व्हिसा नाकारला, अनुपम खेर यांचा आरोप, पाक उच्चायुक्तांनी आरोप फेटाळले——————————
नागपुरातील युग चांडक अपहरण आणि हत्याप्रकरणी दोषींना आज सुनावली जाणारशिक्षा, नागपूर खंडपीठाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष——————————
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज, करवाढीची शक्यता कमी, गेल्या अर्थसंकल्पातली केवळ 25 टक्के रक्कम खर्च——————————
भारतीय ह़ॉकी टीमचा कर्णधार सरदार सिंहवर लुधियानात बलात्काराचा गुन्हादाखल, लग्नाचं आमिष दाखवत बलात्कार केल्याचा तरूणीचा आरोप——————————
समलैंगिकांबाबतच्या पुर्नविचार याचिका सुप्रीम कोर्टानं स्वीकारली, सामाजिक संस्थांच्या विनंतीवरून कलम 377 बाबत फेरविचार होण्याची शक्यता——————————
साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित सुटण्याची शक्यता, मोक्का काढण्यासंदर्भात एनआयएचा कायदा मंत्रालयाकडून सल्ला, तर आम्हालाही सहानुभूती दाखवा, स्फोटातल्या दोन आरोपींची केंद्राकडे मागणी——————————
पर्ल्स कंपनीतील गुंतवणूकदारांना पैसे परत मिळण्याची आशा, सुप्रीम कोर्टाकडून समिती स्थापन करण्याचे आदेश——————————
वरिष्ठांना सूचना न देताच जुगार क्लबवर धाड टाकल्यानं पोलिसांवर कारवाई, बीडच्या दंगल नियंत्रण पथकातल्या 5 पोलिसांचं निलंबन——————————
Post a Comment