✍🏻सकाळच्या हेडलाईन्सवर एक नजर✍🏻
1. महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्या प्रकरणी छगन भुजबळ आज ईडी कार्यालयासमोर हजर राहणार, भुजबळांवर मनी लाँडरिंगचा आरोप
2. तब्बल 91 वर्षांनंतर संघाच्या गणवेशात बदल, हाफ पँट ऐवजी स्वयंसेवकांसाठी फुल पँट, राजस्थानच्या प्रतिनिधी बैठकीत घोषणा
3. विधीमंडळ कामकाजाच्या दुसऱ्या आठवड्याला आजपासून सुरुवात, राज्यपालांचं अभिभाषण आणि दुष्काळाच्या चर्चेवर सरकार उत्तर देणार
4. भूत उतरवण्याच्या नावाखाली पुण्यातल्या देहूरोड परिसरात महिलेला अमानुष मारहाण, मांत्रिकासह पाच जणांवर गुन्हा दाखल
5. मनमाडमध्ये मित्राच्या मदतीनं मनोरूग्ण भावाची हत्या, तर पुण्यात मुलाच्या व्यसनाला कंटाळून आईनं मुलाला संपवलं, 3 महिन्य़ांनंतर हत्येचा उलगडा
6. देशातल्या रखडलेल्या खटल्यांबद्दल मुख्य न्यायाधीशांकडून चिंता व्यक्त, वकिलांचं सहकार्य मिळाल्यास शनिवारीही काम करु, सर न्यायाधीशांची ग्वाही
7. जगातील 27 टक्के मुसलमान दहशतवादी, अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचं वादग्रस्त विधान, वक्तव्याने जगभरात खळबळ
8. कोकणात शिमगोत्सवाला जल्लोषात सुरुवात, छोट्या वाड्यांमधून होळीची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक
9. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या विश्व सांस्कृतिक सोहळ्याचा डोळे दिपवणारा सांगता समारोह, यमुनेच्या काठावर जगभरातील संस्कृतीचा मिलाफ
💐💐💐💐💐💐ज
Post a Comment