0

मुंबई : राज्य शासनाच्या माहितीव जनसंपर्क महासंचालनालयामार्फतदिल्या जाणाऱ्या २०१५ वर्षाच्यापत्रकारिता पुरस्कारांची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कारलोकमत नाशिकचे प्रशांत खरोटे यांना तर पुणे विभागातून नानासाहेब परुळेकर पुरस्कार लोकमतच्या सुषमा नेहरकर-शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. ४१ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणिप्रमाणपत्र असे या दोन्ही पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला. हे पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत प्रदान करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)

Post a Comment

Random Post

 
Top