मुंबई, दि. ४ - मुंबईसह उपनगरे व राज्यातील विविध भागात शुक्रवारी सकाळी अवकाळी पावसानेहजेरी लावली तर नाशिकमध्ये काल रात्रीपासूनच दमदार पाऊस कोसळत आहे. शुक्रवारी पहाटेपासूनच मुंबईतील वातावरण ढगाळ होते, बोरिवली-कांदिवली परिसरात पावसाने हजेरी लाली. तर ठाणे तसेच वसई-विरार भागातही विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोससळल्या. उष्णतेचा कडाका वाढत असतानाच कोसळलेल्या या पावसामुळे राज्यातील नागरिकांनाथोडा थंडावा मिळाला असला तरी यापावासमुळे अनेक पिकांचे व शेतक-यांचे मात्र मोठे नुकसान होणार आहे. दरम्यान काल रात्रीपासूनच नाशिक व जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवातझाली. औरंगाबादमध्येही काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment