0

मुंबई, दि. ११ - इतकी वर्ष मी केलेले उपकार पत्रकारांनी विसरु नयेत, तुम्हाला केलेली मदत, दिलेल्या सुविधा या सगळ्यांचा लेखी पुरावा माझ्याकडे आहे. आणि आता टीआरपीसाठी खोटं बोलताय असा आरोप उद्योजक विजय मल्ल्या यांनी पत्रकारांवर केला आहे. विजय मल्ल्या यांनी ट्विट करुन आपण भारतातून पळालो नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांवर आगपाखड करत आपण केलेली मदत विसरु नये अशी धमकीच दिली आहे. एकदा का प्रसारमाध्यमांनी शिकार करण्यास सुरुवात केली की ते अशा आगीत ओढतात जिथे सत्य आणि पुरावे जळतात आणि फक्त राख राहते असंही विजय मल्ल्या यांनी म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या आल्यात की मी माझी संपत्ती जाहीर करावी. याचा अर्थ बँकांना माझी संपत्ती माहित नाही का ? असा उलट सवाल विचारत संसदेत मी दिलेली माहिती तपासून पाहा असंही म्हणालेत. भारतीय खासदार या नात्याने मी कायद्याचा आदर करतो. आपल्यान्यायव्यवस्था आदरणीय आहे मात्र मिडियाने ट्रायल घेऊ नये असं मिडियाला सुनावलं आहे.

Post a Comment

Random Post

 
Top