डॉ. वा. नि. नारखेडे, मीनाक्षी बेंडे, डॉ. रामप्रसाद खंदारेएकात्मिक शेती पद्धतीमध्ये पीक पद्धतीबरोबर फळे, भाजीपाला, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, वनशेती, मत्स्यशेती, मधमाशीपालन केले जाते.एकात्मिक शेतीद्वारे पीक पद्धती आणि जोड व्यवसाय -१) पीक पद्धती + दुग्ध व्यवसाय + गांडूळखत + चारापिके + बांधावरील झाडे + भाजीपाला + मधमाशीपालन.२) पीक पद्धती + दुग्ध व्यवसाय + कुक्कुटपालन + गांडूळखतनिर्मिती.३) पीक पद्धती + फळपिके + भाजीपाला + शेळीपालन + रेशीम शेती.४) पीक पद्धती + फळपिके + भाजीपाला + दुग्धव्यवसाय + मत्स्यपालन.५) पीक पद्धती - फुलपिके + औषधी वनस्पती + शेळीपालन + मधमाशीपालन.एकात्मिक शेती पद्धतीचा आराखडा (एक हेक्टर) -पीक पद्धती - क्षेत्र (हे.)सोयाबीन - रब्बी ज्वारी - (०.१ हे.)सोयाबीन - रब्बी कांदा - (०.१ हे.)सोयाबीन - रब्बी गहू - (०.१ हे.)मूग - वांगी - (०.१६ हे.)आले - (०.१ हे.)चारापिके -मूग - लसूण घास - ०.१५ हे.नेपिअर गवतफळपिके -लिंबू - साई सरबत्ती - ०.२० हे.आंतरपीकखरीप - सोयाबीनरब्बी - कोबीबांधावरील झाडे - करवंद, शेवगा, अंजन - ०.०४ हे.जनावरांसाठी गोठा, कुक्कुटपालन व गांडूळखत निर्मिती - ०.०५ हे.जोडधंदा -दुग्ध व्यवसाय - १ गाय (होलदेव), १ म्हैस (मुऱ्हा)कुक्कुटपालन - १०० ब्रॉयलर (वनराज, गिरीराज)एकात्मिक शेती प्रारूपामधील समाविष्ट घटक :i] फळपीक आणि आंतरपिके -कागदी लिंबू - ०.२० हे.(२० टक्के) जात - साई सरबती, लागवड १५ x १५ फूट.खताची मात्रा - १५ ते २० किलो शेणखत आणि ८०० ग्रॅम नत्र - ४०० ग्रॅम स्फुरद - ४०० ग्रॅम पालाश प्रतिझाड.आंतर पिके : पहिले वर्ष - कोबीदुसरे वर्ष - प्लॉवरतिसरे वर्ष - लवकीii] बांधावर झाडे : ०.०४ हे.(४ टक्के) - अंजन, शेवगा, करवंदफायदे :१) जनावरांना प्रथिनयुक्त चारा.२) कोवळ्या पाल्याचा भाजी म्हणून उपयोग.३) सजीव कुंपणासारखा उपयोग४) आर्थिक नफा.iii] दुग्ध व्यवस्थापन :- उत्कृष्ट गुणवत्तेची एक होलदेव गाय आणि एक मुऱ्हा म्हैस.- उपलब्ध सामग्रीतून गोठा (प्रति जनावर ६० चौ. फूट जागा) बांधावा.आहार -- एकदल व द्विदल चारा असावा.- दररोज हिरवा चारा २५ किलो व वाळलेला चारा १० किलो द्यावा. ६० ग्रॅम क्षार मिश्रण द्यावे.- दुधाळ गाईस एक ते दीड किलो खुराक शरीर पोषणासाठी, एक किलो खुराक प्रति २.५ लिटर दुग्ध उत्पादनासाठी द्यावा .- म्हशीच्या शरीर पोषणासाठी १.५ ते २ किलो, २ लिटर दुग्धोत्पादनासाठी १ किलो खुराक द्यावा.चारापिके - क्षेत्रफळ ०.१५ हे. (१५ टक्के)खरीप हंगाम : संकरित नेपिअररब्बी हंगाम : लसूण घाससंकरित नेपिअर गवत लागवड :बेणे - २५,००० कांड्या /हे.अंतर - ९० x ३० सें.मी. ( सरी - वरंबा)रासायनिक खते - (प्रतिहेक्टर) ६० किलो नत्र, ३० किलो स्फुरद लागवडीवेळेस. प्रत्येक कापणीनंतर ३० किलो नत्रउत्पादन - २ टन/गुंठालसूण घास लागवड (नोव्हेंबर) :बियाणे प्रमाण - २५ किलो/हे.अंतर - ३० x १० सें.मी.(सारा पद्धत वाफे)खतमात्रा - २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद /हे.उत्पादन : १ टन प्रति गुंठादुध उत्पादन (प्रति वेत):गाय - २००० ते २२०० लिटरम्हैस - १८०० ते २००० लिटरiv] शेळीपालन -प्रत्येक शेळीला १० चौ. फूट आणि करडासाठी ६ चौ. फूट जागा.फायदे :- दूध, मांस व लेंडी खत मिळते.- दीड वर्षात दोन वेतामध्ये एका शेळीपासून चार करडे मिळतात.- चार ते सहा महिन्यांच्या करडांना चांगला बाजारभाव.v] देशी कोंबडी पालन -फायदे : अंडी व मांस उत्पादन, विष्ठेपासून उत्तम प्रतीचे खत .जाती - गिरीराज, वनराज, सुवर्णधारा, कडकनाथ.वैशिष्ट्ये -- अंडी व रुचकर मांसासाठी प्रसिद्ध.- चांगली रोगप्रतिकार शक्ती.- नर चार महिन्यांत मांस विक्रीसाठी उपलब्ध (१२५ रुपये नफा)- मादी ५ ते ६ महिन्यांपासून अंडी देते. वर्षाला १०० ते १२० अंडीvi] मधमाशीपालन - मधमाश्यांमुळे पिकांचे उत्पादन वाढते. मध व मेणापासून उत्पन्न.vii] रेशीम शेती -तुती लागवड क्षेत्र - एक एकर१०० अंडी पुंजासाठी लागणारे क्षेत्र - ७०० ते ७५० चौ. फूटकीटकसंगोपनगृह आकार - ८२ x २३ x १५ फूटपट्टा पद्धतीने तुती लागवड - अंतर (५ x ३) x (२ फूट)- जाती : एम-५, एस-३६, एस-१३, व्ही-१- २५० अंडी पुंजासाठी १ एकर क्षेत्र- १०० अंडी पुंजापासून ६५ ते ७० किलो रेशीम उत्पादन- ५ पिकांपासून सरासरी एक लाखापर्यंत उत्पन्नviii] शेततळ्यातील मत्स्य शेती -आकारमान : ३० x ३० x ३ मीटर . त्यामध्ये ५०० मायक्रॉनची पॉलिथिन शीट तळाशी अंथरुन पाणी भरावे.जाती -१) देशी मासे - कटला, रोहू, मृगल२) विदेशी मासे - सिल्व्हर कार्प (चंदेरा), ग्रास कार्प (गवत्या), सायप्रिन्स- कटला, सिल्व्हर कार्प हे मासे पृष्ठभागावर, रोहू, ग्रास कार्प (गवत्या) मध्य भागात तर मृगळ, सायप्रिन्स हे मासे शेततळ्याच्या तळावर उपजीविका करतात.३) ८ ते १० महिन्यांत ८०० ते १००० ग्रॅम वजनाचे(प्रति हेक्टरी ५००० किलो) मासे मिळतात.एकात्मिक शेतीपद्धती नफा : (क्षेत्र १ हेक्टर )पीक पद्धती व भाजीपाला : ५८,९६० रुपयेदुग्ध व्यवसाय - २२,७२० रुपयेकुक्कुटपालन - ३,७६० रुपयेमधमाशीपालन - २,४७५ रुपये(टीप - बाजारपेठेतील दरानुसार फरक पडू शकतो.)संपर्क - डॉ. वा. नि. नारखेडे, ९८२२९९२८६४(पीक पद्धती योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment