0
✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻
 *दैै पुण्यनगरी सोलापुर विशेष सांगोला नगरपरिषद स्पेशल कव्हरेज,* .......
******************
*सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी २४ हजार मतदार......*
******************
सांगोला / अरुण काका बोञे.
******************
*सांगोला नगरपरिषदेच्या येणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचे प्रभाग निहाय विभाजन करुन अंतिम प्रभाग निहाय मतदार याद्या दि.१५ ऑक्टोबर रोजी प्रसिध्द करण्यात आल्या असून नगरपरिषदेच्या वेबसाईटवरही प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.* *आगामी नगरपालिका निवडणुकीत एकूण २४0३0 मतदार मतदानाचा हक्क बजावतील यामध्ये पुरुषांची संख्या १२४४७ तर महिला मतदारांची संख्या ११५८१ असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी दिली.*

सांगोला नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणुक डिसेंबर २0१६ मध्ये होणार आहे. नगरपरिषदेने या *निवडणुकीसाठी मतदार याद्यांचे प्रभाग निहाय विभाजन करुन प्रारुप व अंतिम प्रभाग निहाय मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. त्यानूसार सांगोला नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी विधानसभेच्या १0 सप्टेंबर २0१६ रोजी अस्तित्वात येणार्‍या मतदार यादीचे प्रभाग निहाय विभाजन करुन अंतिम प्रभाग निहाय मतदार याद्या काल शनिवार दि.१५ ऑक्टोबर रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. सदर याद्या नगरपरिषदेच्या वेबसाईटवरही उपलब्ध असल्याचे मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी सांगितले.* आज जाहिर झालेल्या मतदार यादीमध्ये *१२४४७ पुरुष व ११५८१ महिला मतदार असे एकूण २४0३0 मतदार आहेत. येणार्‍या निवडणूकीसाठी एकूण दहा प्रभागामधून २0 नगरसेवक निवडून देण्यात येणार आहेत. यामध्ये दहा पुरुष व दहा महिला नगरसेवक असणार आहेत. प्रभाग एक १७७१ व प्रभाग दहा १७८२ हे दोन प्रभाग सर्वात कमी मतदार संख्येचे तर प्रभाग चार ३१३२ हा सर्वात मोठा प्रभाग आहे. डिसेंबर होणार्‍या नगरपालिका निवडणूकीत प्रभाग क्र.१ मधून एकूण १७७१ मतदार मतदान करतील यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ९४३ तर महिला मतदारांची संख्या ८२८ इतकी आहे. हा प्रभाग सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे, प्रभाग क्र.२ मध्ये एकूण मतदारांची संख्या ही २0५३ इतकी आहे यामध्ये पुरुष मतदार १0८४ तर महिला मतदार ९६९ इतके आहे हा प्रभाग अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. प्रभाग क्र.३ मध्ये एकूण मतदार संख्या २५२६ इतकी असून यामध्ये १२८७ पुरूष मतदार तर १२३९ महिला मतदार यांचा समावेश आहे. हा प्रभाग अनुसूचित जाती सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. प्रभाग क्र.४ मधून ३१३२ मतदार मतदान करतील. यामध्ये १५८३ पुरुष मतदार तर १५४९ महिला मतदारांचा समावेश आहे. हा प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. प्रभाग क्र.५ मध्ये एकूण मतदार संख्या २५२६ इतकी आहे. यामध्ये १३१५ पुरुष मतदार तर १२११ महिला मतदारांचा समावेश आहे.* हा प्रभाग सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. *प्रभाग क्र.६ मध्ये एकूण मतदार संख्या २७३0 असून यामध्ये १४९५ पुरुष तर १२३५ महिला मतदारांचा अंतर्भाव आहे. हा प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण या प्रवर्गासाठी राखीव आहे. प्रभाग क्र.७ मध्ये एकूण मतदारांची संख्या २१४३ आहे. यामध्ये पुरुष मतदार १११६ तर महिला मतदार १0२७ इतके आहे. हा प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. प्रभाग क्र.८ मध्ये २९७२ इतके एकूण मतदार असून यामध्ये १४८५ पुरुष तर १४८६ महिला मतदारांचा समावेश आहे. हा प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. प्रभाग क्र.९ मध्ये २३९५ एकूण मतदार आहेत. यामध्ये ११८६ पुरूष मतदार तर १२0८ महिला मतदारांचा समावेश आहे. हा प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण व सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. प्रभाग क्र.१0 मध्ये १७८२ एकूण मतदार आहेत. यामध्ये ९५३ पुरुष मतदार तर ८२९ महिला मतदारांचा समावेश आहे. शहरातील प्रभाग १ ते प्रभाग १0 मध्ये एकूण २४0३0 मतदार असून यामध्ये १२४४७ पुरुष मतदार तर ११५८१ महिला मतदार असल्याचे या अंतिम मतदार यादीद्वारे स्पष्ट झाले.*
दै पुण्यनगरी घरा घरात
मना मनात......
*****************
✍🏻 *पञकार जगदिश कुलकणी*
दै *पुण्यनगरी ग्रामीण सांगोला*
*दै *पुण्यनगरी सोशल मिडीया सोलापुर*
मोबा नं ९४२१०४१२४०
✈✈✈✈✈✈✈

Post a Comment

Random Post

 
Top