0
ऑनलाइन लोकमत 
मंडी, दि. १८ - सध्या संपूर्ण जग भारतीय लष्कराबद्दल बोलत आहे. आधी इस्त्रायलच्या लष्कराबद्दल बोलले जायचे. आपले लष्करही अशा प्रकारची कारवाई करु शकते हे आता सर्वांना माहित झाले आहे. आपणही कुठे कमी नाही अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईक्सबद्दल भारतीय लष्कराचे कौतुक केले. 
 
पण त्यांनी स्पष्टपणे सर्जिकल स्ट्राईक्सचा उल्लेख टाळला. हिमाचलप्रदेशातील मंडीमध्ये एका जनसभेमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी तीन हायड्रो पावर प्रकल्पांचे राष्ट्राला अर्पण केले. 
 
२९ सप्टेंबरला भारतीय लष्कराच्या स्पेशल फोर्सेसच्या कमांडोनी पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

Post a Comment

Random Post

 
Top