ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - केंद्र सरकार सीबीएसई बोर्डच्या (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) दहावीची परीक्षा 2018 पासून पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर 25 ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील घोषणा करण्याची शक्यता आहे. मनुष्यबळ विकास मंत्रीपदाची धुरा हाती घेतल्यानंतर जावडेकर यांचा हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता इयत्ता आठवीपर्यंतची ढकलगाडीदेखील बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परीक्षेत नापास होणा-या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. तसेच पाचवीपर्यंतच्याच विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ठेवला आहे.
विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा तणाव कमी करण्याच्या उद्देशाने सीबीएसई बोर्डची दहावीची परीक्षा 2010 मध्ये रद्द करण्यात आली होती. मात्र, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आल्याने या परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
Post a Comment