नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जाणीवपूर्वक कामगारांना संरक्षण देणाऱ्या कायद्यांचे खच्चीकरण करीत असल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. मात्र कामगारांच्या हिताची लढाई काँग्रेस नेटाने लढेल; अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
इंडियन ट्रेड काँग्रेस या काँग्रेसप्रणीत कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना गांधी यांनी मोदी, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर कठोर टीका केली. मोदी यांच्या भारताला उत्पादनाचे जागतिक केंद्र बनविण्याच्या संकल्पनेशी आपण सहमत आहोत. मात्र ही सहमती इथेच संपते; असे त्यांनी नमूद केले.
भारतीय कामगार कामचुकार, अप्रामाणिक आणि अकुशल असल्याचा मोदी यांचा समज आहे. याच समाजातून ते कामगार संरक्षण कायद्यांना दुर्बल करीत आहेत; असा आरोप करून राहुल म्हणाले की; कामगारांनी स्वाभिमान सोडून आपल्या गुढघ्यावर यावे; असा सरकारचा उद्देश आहे. गुजरात, हरयाणा आणि राजस्थान येथील कामगार कायदे पाहिले तर मोदी सरकार कामगार विरोधी असल्याची खात्री पटेल; असेही त्यांनी नमूद केले.
‘हायर अँड फायर’ या नीतीवर मोदी सरकारचा विश्वास असून त्यामुळेच कामगार संघटना आणि कामगार कायदे दुर्बळ करण्याकडे त्यांचा कौल आहे; असा आरोप राहुल यांनी केला.
भारतीय कामगार कामचुकार, बेशिस्त किंवा अप्रामाणिक नाहीत; तर घाबरलेले आहेत. त्यांना आपल्या भवितव्याची, मुलाबाळांच्या भवितव्याची काळजी आहे. आज हातात असलेला रोजगार उद्या असेल किंवा नाही; याची त्यांना भीती आहे; असे मोदी यांनी नमूद केले.
भारतीय कामगार कामचुकार, बेशिस्त किंवा अप्रामाणिक नाहीत; तर घाबरलेले आहेत. त्यांना आपल्या भवितव्याची, मुलाबाळांच्या भवितव्याची काळजी आहे. आज हातात असलेला रोजगार उद्या असेल किंवा नाही; याची त्यांना भीती आहे; असे मोदी यांनी नमूद केले.
सरकारने उद्योगपतींचे ‘वकील’ असल्याची भूमिका न निभावता कामगार आणि उद्योगांमधील ‘न्यायाधीश’ ही भूमिका बजावणे आवश्यक आहे. हे साधून कामगारांच्या मनातील भय दूर करण्यात सरकार यशस्वी झाले; तरच भारत चीनच्या पुढे जाऊ शकेल; असेही ते म्हणाले.
Post a Comment