विहीर पुनर्भरणासाठी रोजगार हमी योजनेतून शेतक-याला साडेबारा हजार रुपयांचे अनुदान मिळते. जॉबकार्डधारक शेतक-यांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
विहीर पुनर्भरणामुळे विहीरीची तसेच जमिनीखालील पाण्याच्या पातळीत देखील वाढ होते. शासनाने या कामासाठी मजुरीचे दर 181 रुपये ठरविलेले आहेत.
सरकारी अनुदानात विहीर पुनर्भरणाची सुविधा उपलब्ध असून देखील शेतकरी त्याचा लाभ घेण्यास पुढे येत नसल्याचे दिसून येते. या योजनेची माहिती गावपातळीपर्यंत पोहोचवण्यात यश येत नसल्यामुळे लाभार्थी संख्या वाढत नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
भारी जमिनीवरील पक्की विहीर असल्यास पुनर्भरणासाठी माती कामाकरीता जास्तीत जास्त साडेचार हजार रुपये अनुदान मिळते. याशिवाय दगडभराई 1662 रुपये, बारीक दगडांसाठी 831 रुपये, शोष खड्डा भराईसाठी 310 रुपये, दगडखरेदीला 1879 रुपये दिले जातात.
वाळू खरेदी,पाईप खरेदी,पाईप खोदकामाला देखील अनुदान दिले जाते.विहीर पुनर्भरणसाठी शेतक-याकडे जॉबकार्ड असणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत किंवा ग्रामसभेकडून लाभार्थी निवडीचा ठराव व शिफारस घेतल्यास प्रस्ताव मंजूर केला जातो.
शेतक-यांना प्रथम ग्रामपंचायत सचिवाची भेट घेऊन माहिती घ्यावी. विहीर पुनर्भरण योजनेची माहिती घेण्यात अडचणी असल्यास पंचायत समितीत गटविकास अधिकारी किंवा तहसीलदाराची देखील भेट घेता येते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Post a Comment