फुलांची आवक कमी; कांद्याचे दर स्थिरसोलापूर - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारपेठेत गत सप्ताहात लग्नसराईमुळे गुलाब, झेंडू, शेवंती या फुलांना मागणी वाढली, पण तुलनेने कमी आवक असल्यामुळे त्यांच्या दरात मात्र तेजी राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.समितीच्या आवारात गत सप्ताहात गुलाबाची रोज एक गाडी, झेंडूची एक ते दीड टन आणि शेवंतीची 500 ते 700 किलो अशी आवक राहिली. एरव्ही तेवढीच किंवा दुपटीने त्यांची आवक असते, पण सध्या लग्नसराई असल्यामुळे या सर्वच फुलांना चांगला उठाव मिळतो आहे. पण सध्या सगळीकडेच दुष्काळी स्थिती असल्याने फुलांची आवक कमी आहे. सध्या जिल्ह्यासह नजीकच्या सातारा, पुणे आणि सांगली, उस्मानाबाद भागातून या फुलांची आवक होत आहे. पण मागणीच्या तुलनेत ती नसल्याने त्यांच्या दरात तेजी आहे. गुलाबाला प्रतिकिलोला 50 ते 100 रुपये तर सरासरी 70 रुपये, झेंडूला प्रतिकिलो 20 ते 60 रुपये तर सरासरी 40 रुपये आणि शेवंतीला प्रतिकिलो 30 ते 70 रुपयेतर सरासरी 50 रुपये असा दर आहे. गेल्या काही दिवसांतील दरांची तुलना करता प्रतिकिलो 20 ते 30 रुपयांनी दर तेजीत आहेत.भाज्या आणि भाजीपाल्यामध्ये कोथिंबीर, मेथी, शेपू, दोडका, भेंडी, गवार यांचे दर पुन्हा तेजीत आहेत. पालेभाज्यांची आवक रोज प्रत्येकी दहा हजार पेढ्यांपर्यंत राहिली. दोडका, भेंडीची प्रत्येकी 30 आणि गवारची 15 क्विंटल अशी आवक राहिली. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी 400 ते 600 रुपये, मेथीला 400 ते 800 रुपये आणि शेपूला 300 ते 600 रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय दोडक्याला प्रतिदहा किलोसाठी 80 ते 140 रुपये, भेंडीला 200 ते 450 रुपये आणि गवारीला 150 ते 300 रुपये असा दर मिळाला. कांद्याचे दर मात्र टिकून होते. कांद्याची आवक 200 ते 300 गाड्यांपर्यंत राहिली. कांद्याला 500 ते 2400 रुपये तर सरासरी 1400 रुपये क्विंटल असा दर राहिला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment