पुणे : गुलटेकडी येथील प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता. 13) भाजीपाल्याची सुमारे 170 ते 180 गाड्यांची आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवकेत वाढ झाल्यामुळे बहुतांश भाजीपाल्याचे दर स्थिर होते. आवक घटून मागणी वाढल्याने दोडका, हिरवी मिरची, वांगी, तांबडा भोपळा यांचे दर वधारले आहेत, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.आवकेमध्ये परराज्यांतून राजस्थानातून 10 ते 12 ट्रक गाजर, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातून 10 ते 12 टेंपो हिरवी मिरची, कर्नाटकातून 4 ते 5 ट्रक कोबी, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतून 3 ते 4 टेंपो शेवगा, मध्य प्रदेशातून 3 हजार गोणी लसणाची आवक झाली. आग्रा येथून 50 ट्रक बटाट्याची आवक झाली होती.स्थानिक आवकेमध्ये बटाट्याची 25 ट्रक, नवीन कांद्याची शंभर आणि जुन्या कांद्याची 2 ते 3 ट्रक, सातारी आले 500 - 550 गोणी, टोमॅटो साडेचार हजार ते 5 हजार क्रेट्स, कोबी 10 ते 12 टेंपो, फ्लॉवर 15 ते 16 टेंपो, ढोबळी मिरची 10 ते 12 टेंपो, तांबडा भोपळा 4 ते 5 टेंपो, पावटा 7 ते 8 टेंपोची आवकझाली होती, तर पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या दीड लाख, तर मेथीची एक लाख जुड्यांची आवक झाली होती
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment