रासायनिक खरासायनिक खतांचा वापर कसा करवा ताद्वारे पिकांना मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करता येतो. माती परीक्षण करून या अन्नद्रव्यांचा वापर करता येतो. जमिनीमध्ये माती परीक्षणाद्वारे नत्र, स्फुरद किंवा पालाश या अन्नद्रव्यांचे प्रमाण तक्त्याप्रमाणे मध्यम असल्यास पिकांना शिफारशीप्रमाणे खते द्यावीत. परंतु जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी असल्यास शिफारस खत मात्रेत 25 टक्क्यांनी वाढ करावी. याउलट अन्नद्रव्यांचे प्रमाण जमिनीत जास्त असल्यास 25 टक्क्यांनी शिफारस खत मात्रा कमी करावी. असे केल्यास संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा होईल. श्ररासायनिक खते दोन चाड्यांच्या पाभरीने द्यावीत. भाजीपाला पिकांना ओळीतून अथवा रोपाभोवती द्यावे. श्रफळझाडांना वयोमानाप्रमाणे दुपारची सावली ज्या ठिकाणी पडते त्या ठिकाणी आळे पद्धतीने खते द्यावीत. श्रनत्रयुक्त खते एकाचवेळी न देता विभागून द्यावे.
- खते दिल्यानंतर पाण्याच्या पाळीवर नियंत्रण ठेवावे.
- खते ओलसर असल्यास खत कोरड्या मातीत किंवा रेतीत मिसळून वापरावे.
- भात पिकास नायट्रेटयुक्त खते देऊ नये. अन्नद्रव्यांच्या कार्यक्षम वापरासाठी युरिया डीएपी ब्रिकेट हेक्टरी 170 किलो द्यावे.
- पावसाळ्यात रासायनिक खतांच्या बॅग उघड्या ठेवू नये.
- चोपण जमिनीत नत्र हे अमोनिअम सल्फेट तर स्फुरद हे सिंगल सुपर फॉस्फेट खताद्वारे द्यावे.
- सूक्ष्म अन्नद्रव्यांची माती परीक्षणाद्वारे कमतरता असल्यास उदा. 4.5 पीपीएम पेक्षा लोह कमी असल्यास हेक्टरी 25 किलो फेरस सल्फेट तर 0.6 पीपीएम पेक्षा जस्त जमिनीत कमी असल्यास 20 किलो झिंक सल्फेट हे शेणखत किंवा गांडूळ खतातून द्यावे.
- ठिबक सिंचनाद्वारे जास्तीत जास्त विद्राव्य खतांचा वापर पीकवाढीनुसार पिकांना करावा.
- उभ्या पिकांत कमतरता लक्षणानुसार युरिया, डीएपी, चिलेटेड लोह, जस्त यांची फवारणी करावी.