61 व्या फिल्मफेअर सोहळ्यावर ‘बाजीराव-मस्तानीची’ची बाजी, सर्वोत्कृष्ट अभिनेता रणवीर सिंह तर अभिनेत्री म्हणून दिपीकाची निवड—————————-
भारत-पाक परराष्ट्र सचिवांमध्ये 20 जानेवारीनंतर बैठकीची शक्यता, पठाणकोट हल्ल्याच्या तपासासाठी पाकिस्तानचं पथक भारतात येणार—————————-
पश्चिम आफ्रिकेत वागाडुगूमध्ये हॉटेलबाहेर गोळीबार आणि स्फोट, दहशतवादीहल्ल्यात 20 जणांचा मृत्यू—————————-
पिंपरीत आजपासून तीन दिवस सारस्वतांचा मेळा, नाम फाऊंडेशनला 70 लाख, तर तिन्ही संमेलनाध्यक्षांना 1 लाख कृतज्ञता निधी—————————
-मोकळ्या जागांचं खासगीकरण होणार नाही, शिवसेनेवर मुख्यमंत्र्यांची कुरघोडी, भाडेपट्ट्यानं दिलेले 235 भूखंड सरकार परत घेणार—————————
-वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर स्कोडा गाडीची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या जेसीबीला टक्कर, गाडीचा चेंदामेंदा, दोघे जखमी—————————
-एटापल्लीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना, बापावर मुलाचा मृतदेह 7 किलोमीटर खांद्यावर नेण्याची वेळ, ग्रामीण रुग्णालयानं अँब्युलन्स नाकारली—————————-
अकोला रुग्णालयाच्या हलगर्जीचा कळस, मृत बाळाऐवजी दुसऱ्याचं जिवंत बाळ सोपवलं, कुटुंबियांकडून दोषींवर कारवाईची मागणी—————————-
प्रेमासाठी पाकमध्ये गेलेला हमीद अन्सारी लष्कराच्या ताब्यात, कुटुंबाची परराष्ट्र खात्याकडे मदतीची याचना, हमीदच्या सुरक्षिततेसाठी सुषमा स्वराजांचेही प्रयत्न—————————-
भारत-पाकच्या सीमा पार करणारी प्रेमकहाणी, पाकिस्तानच्या रिझवानसाठी भारताच्या गौरवचं लिंगपरिवर्तन—————————-
सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषबाधेमुळेच, एफबीआय प्रयोगशाळेचा अहवाल, दिल्ली पोलिस आयुक्तांची ट्वीट करुन माहिती—————————
-बेकायदेशीर होर्डिंगप्रकरणी राज्यातल्या 11 पालिकांना हायकोर्टाचा झटका, कारवाईस कुचराई केल्यानं कारणे दाखवा नोटीस—————————
-फेसबुकवरुन झालेल्या प्रेमानं थेट तुरुंगवास, नागपूरच्या तरुणीनं प्रियकरासोबत रचला अपहरणाचा बनाव, एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट
Post a Comment