पिंपरीत ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दिमाखदार उद्घाटन
Published 16-Jan-2016 09:42 IST | Updated 12:38 IST
mail print Fontincrease Fontdecrease
पिंपरी - पिंपरी-चिंचवडमध्ये ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे आजपासून पुढचे तीन दिवस विविध कार्यक्रमाची साहित्यिक मेजवानी रसिकांना मिळणार आहे.
संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, प्रमुख पाहुणे बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, ज्येष्ठ साहित्यिक व गीतकार गुलजार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, ८८ व्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, पिंपरीच्या महापौर शकुंतला धराडे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, खासदार रामदास आठवले, अमर साबळे, आमदार अजित पवार, गौतम चाबुकस्वार, बाळा भेगडे, पतंगराव कदम, लक्ष्मण जगताप आदी उपस्थित आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १ कोटीचा निधी नाना पाटेकर यांच्या 'नाम' फाउंडेशनला देण्याचे जाहीर केले. डॉ. पी. डी. पाटील यांनी साहित्यात तरूणांचा सहभाग वाढला पाहिजे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी भाषेसमोर अनेक प्रश्न असून नवीन आव्हाने आहेत. या संमेलनामुळे त्यावर मंथन होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.संमेलनस्थळी आचार्य अत्रे आणि पु. ल. देशपांडे यांची थ्रीडी शिल्पकृतीही उभारण्यात आली आहे. संमेलनस्थळी २०० सुरक्षारक्षकांसोबत ५० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून डॉक्टरांचे पथकही तैनात असणार आहे. दरम्यान संमेलनस्थळी मुख्यमंत्री एक तास उशिरा दाखल झाले.
Post a Comment