0

विदर्भ, मराठवाडयातील अंदाजे दोन लाख शेतकरी भेट देण्याची शक्यता असलेल्या राज्यस्तरीय  कृषी आणि पशुपक्षी कृषी प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

28 जानेवारी ते एक फेब्रुवारी दरम्यान या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील विवेकानंद नगरच्या हिवरा आश्रमात 51 एकर जागेत प्रदर्शन भरवले जात आहे. विवेकानंदांचे अनुयायी तसेच शेतक-यांसाठी हे प्रदर्शन एक मेजवानी ठरणार आहे. पशूधन व गोवंशाचे प्रदर्शन आणि माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे.

‘कृषी तंत्रज्ञान, फुलशेती,सेंद्रियशेती, पशुपालन,दुग्धव्यवसाय,सिंचन सामुग्रीविषयक माहिती व साधने यावेळी बघण्यास मिळणार आहे. 200 कंपन्या किंवा संस्था यात सहभागी होत असल्यामुळे शेतक-यांना परिपूर्ण माहिती मिळेल, अशी माहिती आयोजन समितीचे मनिष ढोले यांनी ‘मायआरएमएल’ला दिली.

प्रदर्शनात शेतक-यांना पोल्ट्री,सौर उपकरणे,पॉलिहाऊस, रेशीमशेती,रोपवाटिका,प्लास्टिकल्चर या विषयावर शेतक-यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

शेतक-यांत चर्चासत्रांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. यावेळी बचत गटांची उत्पादने बघण्यास मिळतील.  मेहकरपासून 15 किलोमीटर अंतरावर हिवरा आश्रमात प्रदर्शनाची तयारी सध्या सुरू आहे.

शेतक-यांना या प्रदर्शनाच्या भेटीसाठी मार्गदर्शन हवे असल्यास 9096864241या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Post a Comment

Random Post

 
Top