जगभर युध्दभूमीवर वापरली जाणारी छोटी ड्रोन विमाने आता देशात शेतक-यांच्या पिकांची पाहणी करण्यासाठी वापरली जाणार आहेत. केंद्र सरकारकडून आणल्या जाणा-या नवीन कृषी पीक विमा योजनेत ड्रोन विमाने वापरली जातील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
सध्याच्या विमा योजनेतील पीक कापणी, पीक उत्पादनाच्या नियमावलींवर शेतकरी नाराज आहेत. त्यामुळे नवी योजना शेतक-यांना अधिक सुविधा देणारी ठरेल, असा दावा सरकारी सूत्रांनी केला आहे.
शत्रूंची ठिकाणे शोधून बॉम्बचा मारा करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर जगभर होतो आहे. मात्र, ड्रोनचा यापलिकडचा वैज्ञानिक वापर मोठा असून शेतीमध्ये देखील ड्रोन तंत्राने उपयुक्तता सिध्द केली आहे.
नवीन कृषी पीक विमा योजनेत ड्रोन विमाने शेतावरून फिरतील. ड्रोनची यंत्रणा उपग्रहाशी जोडली जाईल. त्यामुळे पिकाचे अचूक क्षेत्र काढता येईल. पीक कापणी प्रयोगांचा डाटा झटपट पाठवण्यासाठी मोबाईल फोनचा देखील वापर केला जाणार आहे.
Post a Comment