सोलापुरात भेंडी, काकडी, हिरवी मिरचीला मागणी
-
Tuesday, January 12, 2016 AT 06:00 AM (IST)
Tags: market rate
मेथी, शेपू, कोथिंबीर तेजीत
सोलापूर - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात भेंडी, काकडी, हिरवी मिरचीला मागणी राहिली. त्यांच्या दरातही संपूर्ण सप्ताहभर तेजी राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात भेंडीची रोज 20, काकडीची 10 ते 15 आणि हिरव्या मिरचीची 25 ते 30 क्विंटल आवक राहिली. जिल्ह्यातील स्थानिक भागातूनच त्यांची आवक राहिली. संपूर्ण सप्ताहभर त्यांना मागणी टिकून होती; पण मागणीच्या तुलनेत आवक नसल्याने दरातील तेजी मात्र वाढली. भेंडीला 100 ते 400 रुपये, तर सरासरी 300 रुपये प्रतिदहा किलो, काकडीला 100 ते 300 रुपये, तर सरासरी 250 रुपये, तर हिरव्या मिरचीला 150 ते 350 रुपये, तर सरासरी 300 रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. त्याशिवाय वांगी, टोमॅटो आणि बटाट्याचे दर स्थिर राहिले. वांग्याला 100 ते 250 रुपये, तर टोमॅटोला 150 ते 250 रुपये तर सरासरी 180 रुपये आणि बटाट्याला 150 ते 250 रुपये तर सरासरी 200 रुपये प्रतिदहाकिलो असा दर राहिला.
पालेभाज्यांमध्येही तेजी कायम राहिली. विशेषतः मेथी, शेपू, कोथिंबिरीच्या दरात तेजी राहिली. पालेभाज्यांची आवक तुलनेने कमीच राहिली. प्रत्येकी 5 ते 10 हजार पेंढ्यांपर्यंत भाज्यांची आवक राहिली. मेथीला शंभर पेढ्यांसाठी 500 ते 700 रुपये, कोथिंबिरीला 400 ते 800 रुपये आणि शेपूला 500 ते 700 रुपये असा दर मिळाला. कांद्याच्या दरात मात्र काहीशी स्थिरता राहिली. कांद्याची आवक रोज 200 ते 300 गाड्यांपर्यंत राहिली. कांद्याला 700 ते 2200 रुपये तर सरासरी 1100 रुपये क्विंटल असा दर मिळाला.
Post a Comment