0
पर्थ, दि. १२ - ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सलामीवीर रोहित शर्माने शानदार शतक झळकवले आहे. रोहितने १२२ चेंडूत शतक ठोकले यात सात चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. एकदिवसीय सामन्यांमधील रोहितचे हे नववे शतक आहे. विराट कोहली (७२) धावांवर नाबाद आहे. भारताच्या ३६.४ षटकात एक बाद १८९ धावा झाल्या आहेत.   सलामीवीर शिखर धवनच्या रुपाने भारताला ३६ धावांवर पहिला झटका बसला. धवनला (९)धावांवर हेझलवूडने मार्शकरवी झेलबाद केले. पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर हा सामना होत असून, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारताकडून बारिंदर सरन पदापर्ण करत असून, इशांत शर्माच्या जागी भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात आली आहे तसेच मनिष पांडेलाही संघात स्थान देण्यात आले आहे. भारताने याआधीच्या पश्चिम ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या दोन्ही सराव सामन्यात विजय मिळवला आहे. त्यात एक टी-२० व एक वन-डे सामन्यांचा समावेश होता. पाहुण्या संघाला या मालिकेत स्टिव्हन स्मिथच्या नेतृत्वाखालील संघाकडून यापेक्षा कडवे आव्हान मिळणार आहे, हे निश्चित.धोनीसाठी काही अंशी दिलासा देणारी बाब म्हणजे आॅस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नर मालिकेतील सुरुवातीच्या सामन्यांसाठी उपलब्ध राहणार नाही. याव्यतिरिक्त मिशेल स्टार्क दुखापतग्रस्त आहे तर मिशेल जॉन्सनने निवृत्ती स्वीकारली आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांमध्ये समावेश असलेल्या जोश हेजलवुड, जोएल पॅरिस, स्कॉट बोलँड आणि जिमी फॉकनर अनुभवाच्या बाबतीत कमकुवत भासतात.

Post a Comment

Random Post

 
Top