मुंबई, दि. १२ - पनवेल-खांडेश्वर दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पनवेल-खांडेश्वर दरम्यान सिग्नल यंत्रणेतबिघाड झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. ऐन कामावर येण्याच्यावेळी वाहतूक विस्कळीत झाल्याचे नोकरदार प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वे प्रशासनाने सिग्नल यंत्रणेतील बिघाडाचे कारण दिले असले तरी, रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाल्याचे प्रवासी सांगत आहेत. तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, वाहतूक पूवर्वत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment