0

हेडलाईन्स:

1. बँक कर्मचाऱ्यांचा आज एकदिवसीय संप, 5 स्टेट बँकांच्या विलिनीकरणाविरोधात आंदोलन, दोन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे सलग 3 दिवस बँका बंद राहणार————————

2. निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना विशिष्ट कामांसाठी सेवाकरार तत्वावर नियुक्त करण्याचा राज्यसरकारचा निर्णय————————

3. आघाडी सरकारच्या तुलनेत शेतकऱ्यांना यंदा कमी मदत, नव्या अध्यादेशानं फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं————————

4. गोळ्यांची भाषा करणाऱ्यांना गोळ्यांनी उत्तर देऊ, श्रीपाल सबनीसांच्या समर्थनार्थ नितेश राणेंचं वक्तव्य, सबनीसांवर पिंपरी, पुण्यातअदखलपात्र गुन्ह्याची नोंद————————

5. महेश मोतेवारची न्यायालयीन कोठडी आज संपणार, आजपासून 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी,————————

6. पठाणकोट हल्ल्याचे सबळ पुरावे पाकिस्तानला दिले, केंद्र सरकारची माहिती, कारवाईनंतरच भारत-पाकिस्तान बातचीत होणार————————

7. अमिताभ बच्चन अतुल्य भारतचे नवे ब्रँड अॅम्बेसॅडर, आमीर खानला हटवल्यानंतर मोदी सरकारचा निर्णय, कंत्राट संपल्याच्या कारणावर संशयकल्लोळ————————

8. दिल्लीच्या ऑड इव्हन भवितव्याचा आज दिल्ली हायकोर्टात निकाल, गेल्या ७ दिवसांत प्रदूषण किती कमी झालं, याची आकडेवारी आज कळणार————————

9. महाराष्ट्र केसरीच्या गदेला डोपिंगचा डाग, स्पर्धेआधी उत्तेजक द्रव्यं घेताना दोन पैलवान रंगेहात सापडले, कुस्ती संघटनेचा कडक कारवाईचा इशारा————————

10. विधूविनोद चोपडाचा वझिर सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला, अमिताभ बच्चन, फरहान अख्तर, आणि जॉन इब्राहीम प्रमुख भूमिकेत.

Post a Comment

Random Post

 
Top