महाराष्ट्राच्या हळदीचे माहेरघर असलेल्या सांगलीत नवीन हळदीचे आगमन यंदा तेजीत झाले आहे. नवी हळद प्रतिक्विंटल बारा हजार रुपयांपर्यंत विकली गेली आहे.
बुधवारी सांगली मार्केटला शेतक-यांनी 100 ते 150 गोण्या हळद आणली होती. अकरा ते बारा हजार रुपयांनी चांगली हळद विकली गेली आहे.
राजापुरी हळदीची 15 क्विंटल आवक काल झाली असता 9200 ते 11950 रुपयांच्या दरम्यान सौदे झाले.
गेल्या हंगामात सुरूवातीला हळदीचे सौदे आठ हजार ते अकरा हजार रुपयांनी सुरू झाले आहे. त्यामुळे यंदा भाव तेजीत आहेत.
‘दुष्काळी स्थितीमुळे हळदीचे उत्पादन यंदा मोठया प्रमाणात घटणार आहे. किमान 20 ते 40 टक्के उत्पादन काही भागात कमी होणार असल्याने यंदा बाजारात हळदीला मागणी राहील,’ अशी माहिती सूत्रांनी दिली.
Post a Comment