0

मुंबई:वाढत्या प्रदूषणाची गंभीर दखल घेतली जाताना दिसते आहे. दिल्लीतवाहतुकीसाठी सम-विषम नियमाचा प्रयोग करण्यात आला. काही प्रमाणात तो प्रयोग यशस्वीही झाला. मात्र, असे छोटे-मोठे प्रयोग ठिक-ठिकाणी सुरु आहेतच. यादृष्टीनेच महिंद्रा कंपनीने आपलं पाऊल उचललं आहे. महिंद्राने प्रदूषणविरहित स्कूटर लॉन्च केली आहे.भारतीय ऑटो मोबाईल क्षेत्रात अव्वल स्थानी असलेल्या महिंद्रा कंपनीने ‘u’ ही स्कूटर लॉन्च केली आहे. या स्कूटरचं वैशिष्ट्य म्हणेज ही स्कूटर बॅटरीवर धावते. त्यामुळे पर्यावरणाला अजिबात हानिकारक नाही.या स्कूटरची संपूर्ण संकल्पना अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये निश्चितकेली असून मिशीगनमध्ये असेम्बल करण्यात आली आहे. ट्रॅफिक, प्रदूषण इत्यादी समस्यांवर मात करणारी महिंद्राची ही नवी कोरी स्कूटर आहे.विशेष म्हणजे महिंद्राची ‘GenZe 2.0’ ही स्कूटर इंटरनेटशी जोडलेली असेल. एटी अँड टी नेटवर्कच्या माध्यमातून इंटरनेट कनेक्टेड असणार आहे. त्यामुळे स्कूटरच्या राईडशी संबंधित गोष्टी किंवा ट्रॅफिक, हवामान यासंबंधी महत्त्वाची माहिती स्मार्टफोनवरील रिअलटाईम डिस्प्लेवरदिसू शकतील.‘GenZe 2.0’ स्कूटर पूर्ण चार्ज असल्यास साडेतीन तास म्हणजेच 50 किलोमीटर धावू शकते. 2,999 डॉलर म्हणजेच 1 लाख 95 हजार रुपये या स्कूटरची किंमत आहे.

Post a Comment

Random Post

 
Top