0

कॅनबेरा:ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या वन डे सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान टीम इंडियाचा स्टाईलिश फलंदाज अजिंक्य रहाणेला गंभीर दुखापत झाली आहे.रहाणेच्या उजव्या हाताला ही दुखापत झाली आहे. रहाणेची दुखापत इतकी गंभीर आहे की त्यावर चार टाके घालावे लागले आहेत. मात्र संघाला गरज असेल, तर रहाणे मैदानात फलंदाजीसाठी उतरणार असल्याचं समजतंय. मनुका ओव्हल बाहेर नेट्समध्ये रहाणेनं काही काळ सरावही केला.या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडियाला क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरावं लागलं.यावेळी क्षेत्ररक्षण करताना रहाणेच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. त्यामुळे रहाणेला मैदान सोडावं लागलं. रहाणेला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्याच्या बोटाला चार टाके घालण्यात आले.या मालिकेत रहाणेने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे रहाणेची दुखापत टीम इंडियासाठी चिंतेची बाब आहे. मात्र गरज असल्यास रहाणे मैदानात उतरणार आहे.हाताला टाके बसले असूनही जखमी अवस्थेतील रहाणे मैदानात उतरणार आहे. त्यामुळे रहाणेच्या या हिमतीचं कौतुक करावं तितकं कमीच आहे.

Post a Comment

Random Post

 
Top