0

नवी दिल्ली, दि. २० - अभिनेत्री असिन नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. ह्यमायक्रोमॅक्सह्णचे सहसंस्थापक राहुल शर्मासोबत गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती.बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री गजनी गर्ल असिन आणि ह्यमायक्रोमॅक्सह्णचे सहसंस्थापक राहुल शर्मा विवाहबंधनात अडकले आहेत. नवी दिल्लीतील एका चर्चमध्ये काल (मंगळवारी) सकाळी सकाळी ११:३० च्या सुमारास ख्रिश्चन पद्धतीने असिन आणि राहुल विवाह बंधनात अडकले.सब्यसाची मुखर्जीने डिझाइन केलेला स्पेशल ड्रेस आसिन परिधान केला होता.त्यानंतर संध्याकाळी नवी दिल्लीतील दुसित देवराना रिसॉर्टमध्ये हिंदू पद्धतीने असिन आणि राहूलने लग्नाचे सात फेरे घेतले. या विवाह सोळयासाठी जवळचे नातेवाईक आणि काही मित्रांची उपस्थिती होती. तसंच राहूल आणि असिनचा जवळचा मित्र खिलाडी अक्षय कुमारची ही उपस्थिती होती. संध्याकाळी पार पडलेल्या विवाह सोहळ्यातील जेवन पुर्णपणे शाकाहारी ठेवण्यात आले होते.दरम्यान अक्षय कुमारच्या माध्यमातून काही वर्षांपूर्वी असिन आणि राहुल यांची एकमेकांशीओळख झाली होती.येत्या २३ तारखेला मुंबईत त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला बॉलिवूडमधील दिग्गज उपस्थित राहणार असल्याची माहीती आहे.

Post a Comment

Random Post

 
Top