आजचा शेती सल्ला:थंडीमध्येद्राक्ष बागेचे व्यवस्थापन-इरफ़ान शेख,केज,
बीडसध्या द्राक्ष बागेमध्ये वातावरण चांगले असले,तरी दिवसाचे तापमान वाढलेले व रात्रीच्या तापमानात घट दिसते. या वातावरणाचाद्राक्ष बागेमध्ये होणारा परिणाम व त्यावरील उपाययोजना यांची माहिती घेऊ.- मणी सेटिंग ते ८-१० मिमी अवस्था:
* या अवस्थेतील द्राक्ष बागेत आता रिव्हर्स डीप संपला आहे.यापूर्वी दिलेल्या जीएच्या उपलब्धतेमुळे मण्यांची वाढ जोमात होईल, अशा अपेक्षेने आपण बागेकडे लक्ष देत असतो. जीएचे चांगले परिणाम म्हणजेच मण्याची फुगवण मिळण्याकरिता वेलीमध्ये शरीरशास्त्रीय हालचाली तितक्याच जोमाने होण्याची गरज असते. त्यासाठी वातावरणात योग्य तापमान व आर्द्रता आवश्यक असते. किमान तापमानात झालेल्या घटीमुळे बागेत या अवस्थेमध्ये मण्यांचा साइज वाढत नाही. तसेच या वेळी मुळीचेसुद्धा कार्य कमी होत असते. किमान तापमान शून्याच्या खाली जाते, तेव्हा वेल सुप्तावस्थेत असते. आपल्याकडेस्थिती नसली तरी तापमानातील घटीमुळे वेलीच्या पेशीमधील हालचालीचा वेग कमी होतो. यावर काही उपाययोजना करणे गरजेचे आहे.
* थंडी अधिक वेळ टिकून राहिल्यासघडाच्या विकासाकरिता अधिक वेळ लागेल. तो कमी करता येणार नाही. मात्र बागेमध्ये मुळांचे कार्य वेगाने होण्यासाठी बोद खोदून (टाचून) घ्यावा. ज्या ठिकाणी बोद टाचणेशक्य नसेल, त्या बागेत ट्रॅक्टरने बोदाच्या बाजूने फणून घ्यावे. मुळी काही प्रमाणात मोकळी होऊन पुन्हा कार्य करायला लागेल. थंडीच्या कालावधीमध्ये घडाच्या विकासातमदत होईल.
* पाण्याची उपलब्धता असलेल्या बागेत मोकळे पाणी दिल्यास बागेतील तापमान वाढविण्यास मदत होईल. मात्र पोषक वातावरण निर्माण होऊन बागेमध्ये भुरीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. पाणी देण्यापूर्वी भुरी नियंत्रणासाठी आधीचउपाययोजना कराव्यात.
* बोद मोकळे करून, त्यावरकाडीकचरा किंवा प्लॅस्टिक आच्छादन केल्यास मुळीचे तापमान वाढेल. त्यांच्या कार्यक्षमतेतवाढ होऊन मणी विकासाला मदत होईल. बागेमध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्यता राहील.
* बागेत पाने तजेलदार,पानांची प्रकाशसंश्लेशनाची अजूनही क्षमता चांगली आहे व यापूर्वी संजीवकाचा वापर जास्त प्रमाणात झालेला नाही, अशा स्थितीत फार कमी प्रमाणात जीए (१०-२० पीपीएम) फवारणी केल्यासमण्यांची वाढ लवकर होऊ शकते.- प्रीब्लूम ते मणी सेटिंगची अवस्था:
* या अवस्थेतील बागेत सध्या वाढत्या थंडीमुळे पानांची आवश्यक ती संख्या अजून पूर्ण झाली नसेल. त्याचा शेंडा थांबला असा याचा अर्थ होईल.
* या अवस्थेत बागेमध्ये नत्राचा वापरमहत्त्वाचा असून, वेलीवर दीड ते दोन ग्रॅम युरिया प्रति लिटरप्रमाणे १-२फवारणी केल्यास शेंडा वाढ करून घेता येईल.
* मणी सेटिंग झाल्यानंतर ही शेंडावाढकरण्याकरिता नत्र उपलब्धतेचा ऊपयोग होत नाही.
* बागेमध्ये मल्चिंग करणे या बागेतसुद्धा उपयुक्त ठरेल.
* शेकोटी करून धूर केल्यास १ ते २ अंश सें. तापमान वाढू शकते.
* ४ ते ५अंश सें.ला पाने व घड गळण्याची शक्यता असते.
* १० अंश सें.ला वेलीचे काम थांबते तर ७ अंशच्याखाली गेल्यास वेलीला धोका निर्माण होऊ शकतो.योग्य ती काळजी घ्या.
"अजनाळे नगरी" इंस्टॉल करा आणि मिळवा ताज्या बातम्या , कृषी वातॉ व आजचे बाजारभाव !!!यासाठी हि लिंक वापरा https://play.google.com/store/apps/details?id=com.ajanale.nagari किंवा प्ले स्टोर वर Ajanale Nagari सर्च करा.धन्यवाद.
Post a Comment