वॉशिंग्टन, दि. २३ - अमेरिकेच्या पूर्व किना-यावर गेल्यादोन दिवसांपासून बर्फाचे वादळआले असून पूर्वेकडिल राज्यांवरती याचा मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे. सध्या पडलेल्या बर्फाचा काही ठिकाणी पाच ते सहा इंचाचा थर निर्माण झाला असून वादळ गेल्यानंतरदोन फुटांपर्यंत बर्फ साठण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या वादळामुळे सहा राज्यांमध्ये आणिबाणी घोषित करण्यात आली आहे, तर नॉर्थ कॅरोलिना राज्यामध्ये एक लाख घरांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. तसेच ७००० विमानउड्डाणे रद्द करण्यात आली आहे. या वादळामुळे टेनेसी, नार्थ कॅरोलिना, केंटुकी राज्यांमध्ये या वादळामुळे झालेल्या अपघातात आठ व्यक्तींना प्राण गमवावे लागले आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment