केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक; नाशिकमध्ये कृषी महोत्सवास प्रारंभनाशिक - शेतकरी आज अडचणीत आहेत; परंतु शेतकरी उभा राहिला तरच देश उभा राहू शकतो, त्यामुळे या संकटाच्या काळात शेतकऱ्यांसोबत राहणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधक चॅरिटेबल ट्रस्ट आणि राज्य शासनाच्या कृषी व ऊर्जा विभाग यांच्यामार्फत भरविलेल्या कृषी महोत्सवाचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा व गृह राज्यमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २२) करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. नाईक बोलत होते.कार्यक्रमास केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा,ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, गृह राज्यमंत्री राम शिंदे, खासदार राजू शेट्टी, खासदारश्रीरंग बारणे, माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सौ. सीमा हिरे, आमदार बच्चू कडू, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, महापौर अशोक मूर्तडक यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.श्री. नाईक म्हणाले, की वनौषधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हाव्यात म्हणून आयुष मंत्रालयाने वनौषधी लागवड योजना जाहीर केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान मिळणार असून कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांनी वनौषधी लागवड योजनेचा फायदा घ्यावा.गृह राज्यमंत्री राम शिंदे म्हणाले, की सेवा मार्गातर्फे सुरू असलेल्या या कृषी महोत्सवातूनशेतकऱ्यांना नवी उमेद मिळणार आहे. खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, की अवकाळीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला सावरण्याचे काम सेवा मार्गातून केले जाते ही खरोखरच स्तुत्यबाब आहे. ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले, की सरकारचे प्राधान्य नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला असते; परंतु सरकार म्हणून काही मर्यादा येतात. अशा स्थितीत शेतकऱ्यांसाठी सेवा मार्गाकडून थेट बाजारपेठ, सेंद्रिय शेती, स्वावलंबी शेतकरी आदी योजना राबवून मोठे काम केले जात आहे.आत्महत्याग्रस्त व दुष्काळपीडित विदर्भ, मराठवाड्यातील दहा कुटुंबांना स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या पंचसूत्री कार्यक्रमानुसार वस्तुरूप मदत करीत शुक्रवारी जागतिक कृषी महोत्सवाला येथील डोंगरे वसतिगृह मैदानावर प्रारंभ झाला. स्वामी समर्थ सेवा मार्गाने शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्यासाठी सुरू केलेला कृषी महोत्सवाचा उपक्रम देशपातळीवर राबविला पाहिजे, अशा शब्दांत मान्यवर वक्त्यांनी सेवा मार्ग व त्याचे प्रमुख अण्णासाहेब मोरे यांचा गौरव केला.उद्घाटनानंतर तेथे उभारण्यात आलेल्या सभागृहात सर्व प्रमुख पाहुण्यांचा अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी सर्वच वक्त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न व सेवामार्गामार्फत ते सोडविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा गौरव केला. विष्णू सावरा म्हणाले, सेवा मार्गातर्फे वनौषधींचे महत्त्व सामान्यांपर्यंत पोचविण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या महोत्सवातही ४०० वनौषधी मांडण्यात आल्या आहेत. आदिवासी विकास विभागातर्फेही लवकरच वनौषधी संवर्धनाचे काम सुरू केले जाणार असून त्या मार्फत आदिवासी भागाचा कायापालट होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. त्र्यंबकेश्वर गुरूकुलपीठाचे चंद्रकात मोरे व स्वामी समर्थ कृषी संशोधन संस्थेचे नितीन मोरे यांनी मान्यवर
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment