रासायनिक खते वापरात घट; जमिनीच्या आरोग्यात सुधारणापुणे : पीक उत्पादनासाठी अावश्यक असलेल्या माती आणि पाणी या नैसर्गिक घटकांचे सातत्याने परीक्षण केल्याने जमिनीचे आरोग्य सुधारत आहे. परीक्षणानंतर कमतरता असलेले अन्नद्रव्ये, सूक्ष्म मूलद्रव्ये यांचा पुरवठा केल्याने जमिनीची उत्पादन क्षमता वाढली. उत्पादन वाढीसाठी होत असलेला रासायनिक खतांचा वापर कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चातही बचत झाली. हेक्टरी उत्पादनात वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी येऊ लागली आहे.उत्पादन वाढीसाठी जमिनीची उत्पादकता आणि सुपीकता या दोन्ही गोष्टी महत्त्वपूर्ण असतात. मागील काही वर्षांमध्ये शेतीमधून अधिकाधिक उत्पादन मिळविण्यासाठी रासायनिक खतांचा अवाजवी आणि असंतुलित वापर केला गेला. पाण्याचा बेसुमार पुरवठा यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडले. पारंपरिक पद्धतीने सातत्याने ठरविक पिके घेतल्यानेही जमिनीच्या उत्पादनक्षमतेवर परिणाम झाला. पिकांची खुंटलेली वाढ, उत्पादनाच्या दर्जात झालेली घट, जमिनीची नापिकी आदी समस्या वाढल्या असून, शेतकरी अडचणीत सापडला. सातत्याने माती आणि परीक्षण करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण कमी आहे. माती आणि पाण्याचे परीक्षण करणे गरजेचे झाले असून, मात्र याबाबत अलीकडे जागरूकता वाढली आहे. यासाठी कृषी विभाग, विद्यापीठे, संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्रांकडून शेेतकऱ्यांना खते, कीड नाशके, याविषयी मार्गदर्शन केले जात आहे.माती, पाणी परीक्षणाचे महत्त्व वेळीच ओळखून सातत्याने तपासणी करत प्रगतिशील शेतकऱ्यांनी या समस्यांवर मात केली आहे. माती परीक्षणामुळे शेत जमिनीचा प्रकार, तिचे भौतिक, रासायनिक, कायिक गुणधर्म, अन्न द्रव्याची उपलब्धता त्यानुसार जमिनीमध्ये हवा, पाणी यांचा समतोल राखणे, क्षारता, घट्टपणा, चोपण इत्यादी दोष दूर करणे, जमिनीला वपिकाला आवश्यक अन्नद्रव्य, खतांच्या मात्रांचा अवलंब करणे शक्य झाले. जमिनीच्या मर्यादा लक्षात घेऊन त्यानुसार पीक व्यवस्थान करून उत्पादनात वाढ होत आहे. आवश्यक त्या प्रमाणात रासायनिक खते दिल्याने जमिनीचा प्रतिसाद वाढला. बुरशी, कीड रोग कमी झाल्याने हमखास उत्पादन मिळू लागले. रासायनिक खाताचे वापर ३०ते ४० टक्के कमी झाल्याने खर्चात बचत झाली. जमिनीतील नैसर्गिक कर्ब वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापरही वाढल्याचे दिसून आले आहे. पाणी परीक्षणामुळे पिकांच्या वाढीवर चांगला परिणाम झाला असून, बुरशी, कीडनाशक रसायने यांची परिणामकारकता वाढली आहे. क्षारांवर नियंत्रण आणून ठिबक सिंचन यंत्रणा अधिक कार्यक्षम करणे शक्य झाले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment