मुंबई :
दमदार संवादांनी चित्रपटगृह दणाणून सोडणाऱ्या ‘नटसम्राट’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाना पाटेकर यांच्या अभिनयाने सजलेल्या ‘नटसम्राट’ने बॉक्स ऑफिसवर एका आठवड्यात 16 कोटी 50 लाख रुपयांची कमाई केली आहे. मराठीतील सर्वाधिक ओपनिंगमिळालेला हा पहिला सिनेमा ठरला आहे.‘नटसम्राट’ 1 जानेवारी रोजी 450 थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. सुट्टीचा पुरेपूर उपयोग करुन या सिनेमाने अवघ्या तीन दिवसात दहा कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.कुसुमाग्रज यांच्या लेखणीतून साकारलेली ‘नटसम्राट’ ही रंगभूमीवरील अजरामर कलाकृती रुपेरी पडद्यावर मांडण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी पेललं. नाना पाटेकर यांनी यात आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका साकारली. नानांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटाततर पाणावलेल्या डोळ्यांनी प्रतिसाद दिला. त्याचाच परिणाम बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळाला.दरम्यान, ‘नटसम्राटची 30 टक्के रक्कम ‘नाम फाऊंडेशन’ला देण्याची घोषणा नाना पाटेकर यांनी सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी केली होती.
Post a Comment