अहमदनगर:आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता पाटील आता डान्सबार बंदीसाठी रणांगणात उतरल्या आहेत. स्मिता पाटील यांनी आर. आर. पाटील फाऊंडेशनच्या वतीने राळेगणमध्ये जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची भेट घेतली. यावेळी स्मिता यांनी डान्सबार बंदीसंदर्भात अण्णांशी चर्चा केली.डान्सबार बंदीसंदर्भात अण्णा हजारे यांची भूमिका सकारात्मक असल्याची माहिती स्मिता पाटील यांनी या भेटीनंतर सांगितलं. शिवाय, डान्सबारसंदर्भात योग्य ती भूमिका मांडावी, यासाठी अण्णा राज्य सरकारलाआवाहन करणार आहेत, अशीही माहिती स्मिता पाटील यांनी दिली.सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून न्यायालयीन बाजू मांडण्यास सरकार कमी पडत आहे, असा आरोप स्मिता यांनी केला. शिवाय. डान्सबार बंदी हा समाजहिताचा निर्णय असून सरकारनं योग्य भूमिका न घेतल्यास आगामी काळात आंदोलन छेडण्याचा इशाराही स्मिता यांनी दिला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment