0

कोल्हापूर : येथे शिवसेनेच्या दोन गटांत जोरदार राडा झाल्याने तणाव आहे. हा राडा शिवसेना नेत्या आणि आमदार निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत झाला. हा प्रकाररविवारी रात्री घडला.अंबाबाई मंदिर परिसरात शिवसैनिकांमध्ये हाणामारी झाली. यामुळे शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. विशेष म्हणजे निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीतच हा राडा झाला. रणजित आयरेकर या युवा सेनेच्या पदाधिका-याला मारहाण करण्यात आली. राजेश क्षीरसागर गटाच्या शिवैसैनिकांनी मारल्याचा आरोप केला जातोय. आयरेकर जिल्हाप्रमुख संजय पवार गटाच कार्यकर्ते आहेत.  दरम्यान, राजवाडा पोलीस स्टेशनमध्येगुन्हा दाखल करण्यात आलाय.रणजित आयरेकर यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी राहुल बंदोडे, उमेश रेळेकर, सुनील जाधव यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. हे तिघेही आमदार राजेश क्षीरसागर यांच्या जवळचे कार्यकर्ते आहेत. तर आयरेकर हे जिल्हाप्रमुख संजय पवार गटाचे आहेत.

Post a Comment

Random Post

 
Top