मेलर्बन, दि. १७ - ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या तिस-या एकदिवसीय सामन्यात भारताला प्रारंभीच रोहित शर्माच्या रुपाने धक्का बसला, मात्र सलामीवीर शिखर धवन आणि विराट कोहलीने डाव सावरला. भारताच्या १८ षटकात एक बाद ७७ धावा झाल्या आहेत. धवन (३६) आणि विराट (३०) धावांवर खेळत आहे. दोघांनी दुस-या विकेटसाठी नाबाद (६२) धावांची भागीदारीकेली आहे. रोहित अवघ्या (६) धावांवर बाद झाला. त्याला रिचर्डसनने वाडेकरवी झेलबाद केले. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया २-० ने आघाडीवर आहे. मालिकेत आव्हान टिकवण्यासाठी भारताला आजच्या सामन्यात विजय आवश्यक आहे. मागच्या दोन सामन्यात रोहित शर्माची सलग दोन शतके वाया गेली होती. भारताने ३०० पेक्षा जास्त धावा करुनही भारताला सामने जिंकता आले नव्हते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment