मुंबई : पाय घसरून पडल्यामुळे राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी रॉयलस्टोन या आपल्या शासकीय निवासस्थानी पंकजा मुंडे आपला मुलगा आर्यमान याच्यासोबत स्वयंचलित स्कुटरवर सराव करत होत्या. यावेळी स्कुटरवरून अचानक पाय घसरल्याने त्या जमिनीवर कोसळल्या. त्यांच्या डोक्याला बराच मार लागला असून थोडा रक्तस्रावही झाला. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करून स्कॅनिंग करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment